बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

Beed Railway Station update : बीडकरांसाठी खुशखबर हाती आली आहे. नव्या रेल्वे मार्गिकेमुळे बीडमधील भक्तांना साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार आहे.
Beed Railway
Beed Railway Station updateSaan tv
Published On
Summary

बीड–अहिल्यानगर नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन उद्या मुख्यमंत्री फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार

या मार्गामुळे बीडहून शिर्डी व शनी शिंगणापूरला पोहोचणं अधिक सोयीचं होणार

६७.७८ कि.मी लांबीचा हा रेल्वेमार्ग अनेक पूल, ब्रिजेस आणि स्थानकांनी युक्त

या सेवेमुळे धार्मिक पर्यटनास चालना मिळणार

बीडकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली हे. धार्मिक पर्यटन आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणारा नवी रेल्वेमार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे बीडहून शिर्डीतील साईबाबा मंदिर, शनी शिंगणापूर मंदिरापर्यंत जाणं अधिक सोपं होणार आहे. यामुळे बीडमधील भक्तांच्या वेळेची बचत होणार आहे. बीड ते अहिल्यानगर या नव्या रेल्वे मार्गिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमलनेर(भां) –बीड नवीन रेल्वेमार्गीकेचे उद्घाटन, बीड ते अहिल्यानगर पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. येत्या बुधवारी म्हणजे उद्या हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासोबत साजरा होणार आहे.

६७.७८ कि.मी. लांबीचा आमलनेर(भां) –बीड नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग ही २६१.२५ कि.मी. लांबीच्या अहिल्यानगर –बीड –परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गिका प्रकल्पाचा भाग आहे.

अहिल्यानगर –अंमळनेर(भां) या ९९.०३ कि.मी. लांबीच्या विभागाचे उद्घाटन आधीच झालं आहे. या विभागावर नियमित गाड्यांची सेवा सुरू आहे.

६७.७८ कि.मी. लांबीच्या अंमळनेर (भां) – बीड या नवीन रेल्वेमार्गीकेच्या उद्घाटनाचे काम अतिशय आव्हानात्मक ठरलंय. या विभागात १५ मोठे पूल, ९० लहान पूल, १५ रोड ओव्हर ब्रिज, ३१ रोड अंडर ब्रिज तसेच ५ स्थानकांचे बांधकाम करण्यात आलंय.

या प्रकल्पाचा खर्च भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये ५०:५० टक्के वाटा या तत्त्वावर करण्यात येत आहे.

कोणाला होणार फायदा?

या रेल्वे सेवेमुळे मराठवाडा प्रदेशाचा महाराष्ट्राच्या इतर भागांशी संपर्क साधला जाईल. महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशातील पारंपरिक दुष्काळग्रस्त भागांचा सामाजिक-आर्थिक आणि औद्योगिक विकास साधण्यातही मदत होईल. बीड ते अहिल्यानगर या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आल्याने या विभागावर रेल्वे सेवांची सुरुवात होणार आहे. यामुळे या विभागातील बीड, राजुरी(नवगण), रायमोहा, विघनवाडी, जाटनांदूर आणि अंमळनेर(भां) या स्थानकांशी संपर्क सुधारेल आणि त्या भागांचा विकास साधला जाईल.

Beed Railway
Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

या विस्तारित गाडी सेवा विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि प्रवाशांना परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात मदत करेल. या विभागावरील प्रदेश कृषी उत्पादनांपुरतेच मर्यादित न राहता अनेक लहान, मध्यम उद्योगही आहेत. तसेच जिल्हे त्यांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक प्रसिद्धीसाठीही ओळखले जातात.

Beed Railway
Horrific Accident : विमानतळ रोडजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रकने डझनभर लोकांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्हा त्याच्या कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि शनी शिंगणापूर मंदिर ही प्रमुख तीर्थस्थळे आहेत. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय भंडारदरा धरण, कळसुबाई शिखर, रंधा धबधबा, रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि इतर पर्यटनस्थळे ही येथे महत्त्वाची आकर्षणे आहेत. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी येथील प्रसिद्ध वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे. तर तेथील दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय या जिल्ह्यात इतर धार्मिक महत्त्वाची ठिकाणेही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com