ravikant tupkar to contest lok sabha election from buldhana constituency  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Breaking News: अटक बेकायदेशीर... 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांना जामीन मंजूर

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १९ जानेवारी २०२४

Buldhana Breaking News:

सोयाबीन व कापूस दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरूवारी सायंकाळी उशिरा राजूरी घाटातून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत तुपकरांचा जामीन मंजूर केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना अटक करून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने रविकांत तुपकर यांची जामीनावर सुटका केली असून, पोलिसांनी तुपकरांची केलेली अटक ही बेकायदेशीर ठरवली आहे.

मोठे आंदोलन उभारणार..

या सुटकेनंतर रविकांत तुपकर यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. "मला झालेली अटक ही बेकायदेशीर ठरवली आहे. सरकारने कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करु.." असेही ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटकेविरोधात कार्यकर्त्यांची निदर्शने...

दरम्यान, पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या अटकेविरोधात तुपकरांच्या समर्थकांनी खामगाव- बुलढाणा रोडवरील वरवंड फाटा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला होता. तसेच आज रविकांत तुपकर यांना न्यायालयात आणल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT