Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : आठवडाभरापासून कुटुंब गावी; चोरट्यांनी संधी साधत घरातून रोख रक्कमेसह दागिने केले लंपास

Buldhana News : बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीत वास्तव्यास असलेले संदीप वानखेडे यांच्या घरात चोरी झाली आहे. संदीप वानखेडे हे मागील एक आठवड्यापासून कुटुंबासह मूळ गावी आंबेटाकली येथे गेले होते

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यानी कुलूप तोडून घरफोडी केली. यात घरातील दागिने व ३५ हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. सदरचा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली असून तपास करत आहेत. 

बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीत वास्तव्यास असलेले संदीप वानखेडे यांच्या घरात चोरी झाली आहे. संदीप वानखेडे हे मागील एक आठवड्यापासून कुटुंबासह मूळ गावी आंबेटाकली येथे गेले होते. यामुळे घर दोन दिवस बंद असल्याचे पाहून चोरट्यानी संधी साधली. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून त्यातील ३५ हजार रोख व सोन्याचं मंगळसूत्र व सोन्याचं पेंडाल चोरट्यांनी चोरून नेले.  

कुटुंब घरी आले असता घटना उघडकीस 

दरम्यान आज सकाळी संदीप वानखेडे हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसून आला. यामुळे त्यांनी घरात जाऊन बघताच सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले आढळून आले. याबाबत तात्काळ त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली जाऊन पाहणी केली व फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमला बोलावून तपासणी केली. चोरीची तक्रार् बुलढाणा पोलिसात दिली असून अज्ञात चोरट्याचा तपास पोलीस करीत आहे.

लूटमार करणारा चोरटा ताब्यात 

सांगलीच्या नागपूर- रत्नागिरी महामार्गावर प्रवाश्यांना लुटणाऱ्या एका चोरट्याला सांगली पोलिसांनी जेरबंद केला आहे. एक महिन्यापूर्वी नागपूर- रत्नागिरी महामार्गावरील अर्जुनवाड फाटा या ठिकाणी देवदर्शन करून परतणाऱ्या कुटुंबाला लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गतीने तपास करत या प्रकरणी सुमित काळे याला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सोना-चांदीच्या दागिन्यासह ३९ हजारांची रोकड जप्त करण्यात  आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manali Winter Tourism: हिवाळ्यात मनाली ट्रिप प्लान करताय? 'ही' आहेत 8 Hidden लोकेशन्स

Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा

शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

Pear Benefits: थंडीत पेर खाल्ल्याने शरिराला होताता 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला, आमदार कांदेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

SCROLL FOR NEXT