Pankaja Munde News : बारामतीसारखाच विकास मराठवाड्यातही करणार; मंत्री पंकजा मुंडे यांनी केला निर्धार

Baramati news : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटन करण्यात आले
Baramati News
Baramati NewsSaam tv
Published On

बारामती : अजितदादांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन; असा निर्धार पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. तसेच पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या भारावून गेल्या; यानंतर त्यांनी मराठवाड्यात देखील बारामतीसारखाच विकास करण्याचा निर्धार केला. 

Baramati News
Nandurbar ZP : नंदुरबार जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपुष्टात; जिल्हा परिषदेसह ६ पंचायत समितीवर प्रशासक राज

अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखे 

एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. असे म्हणत बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यासह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Baramati News
Manmad Bajar Samiti : दोन दिवसाच्या बंदनंतर मनमाड बाजार समिती सुरू; शेतकऱ्यांना दिलासा

विकासकामांचा दर्जा अत्यंत चांगला 

बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा अत्यंत चांगला आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले असल्याचा उल्लेख देखील मंत्री मुंडे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com