buldhana Crime News robbery at bori adgaon Village in khamgaon taluka  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Crime News: खामगाव तालुक्यातील बोरी आडगावात सिनेस्टाईल दरोडा; एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

Buldhana News Today: बुलढाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातल्या बोरी आडगाव येथील एका शेतातील घरावर पाच अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News Today: बुलढाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातल्या बोरी आडगाव येथील एका शेतातील घरावर पाच अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. तसंच चाकूच्या धाकावर सोने नाणे आणि रोख रकमेची लूट केली.

इतकंच नाही तर, त्यांनी घरातील व्यक्तींना बेदम मारहाण देखील केली. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमधील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला तातडीने उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही थरारक घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील (Buldhana News) बोरी आडगाव येथील शेत शिवारात असलेल्या तायडे यांच्या घरावर दुचाकीने आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर हल्ला चढविला. महिलांच्या अंगावरील दागिने काढत पैशांची लूट केली. (Breaking Marathi News)

यावेळी घरातील काही महिलांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत (Crime News) एका २४ वर्षीय युवकासह दोन महिला आणि कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले. घटनेनंतर दरोडेखोर हे पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे देखील हजर झाले. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datta Jayanti Puja Vidhi: श्री दत्त जंयत्ती पूजा कशी करावी? कोणत्या मंत्राचा जप करावा?

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT