ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रेम हे कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकते. प्रेमाला बधंन नसते. असं म्हटलं जाते.
मात्र हे प्रेम जेव्हा एखाद्या विवाहित व्यक्तीवर होते. तेव्हा थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
कारण विवाहित व्यक्तीशी होणारे प्रेम तुम्हाला अडचणीत आणू शकते.
विवाहित लोकांना डेट करणे म्हणजे तुमचे हृदय तुटू शकते.
विवीहित व्यक्ती सहज प्रेमात पडतात, मात्र ज्यावेळेस कुटुंब सोडायची वेळ येते तेव्हा ते त्यातून माघार घेतात.
विवाहित व्यक्तीवर प्रेम असताना सार्वजनिक ठिकाणचे भान असणे महत्वाचे असते.
विवाहित व्यक्तीवर प्रेम झाल्यास ती व्यक्ती नेहमीच तुम्हाला वेळ देईल असं होणार नाही त्यांच्यावर कुटुबांची जबाबदारी असते.
तसेच जेव्हा ते त्यांच्या कुटुबांसोबत असतात. तेव्हा ते तुम्हाला दुर्लक्ष करताना दिसतात.
जेव्हा तुम्ही एखादया मॅरीड व्यक्तीशी रिलेशन ठेवता तेव्हा फक्त तात्पूरत्या सुखाचा विचार करता. जे की खूप चुकीचं आहे
मुळात तुम्ही स्वत:लाच फसवत असता. ज्यामुळे तुम्हाला खरं प्रेम आणि खरा आनंद मिळत नाही.