Uttar Pradesh Crime News A husband who had a love marriage killed his wife in Gurugram
Uttar Pradesh Crime News A husband who had a love marriage killed his wife in GurugramSaam TV

Shocking News: प्रेमकथेचा भयानक शेवट! ज्याच्यासाठी जन्मदात्या आई-वडिलांना सोडलं; त्यानेच तिला दीड महिन्यात संपवलं

Uttar Pradesh Crime News: एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये घडला आहे.

Uttar Pradesh Crime News: खासगी रुग्णालयात कामाला असलेल्या तरुणीची इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. दोघेही एकमेकांच्या इतक्याजवळ आले, की त्यांनी सोबत जीवन जगण्याची शपथच घेतली. मात्र, तरुणीच्या आई-वडिलांचा या प्रेमाला विरोध होता. त्यांनी लग्नाला नकार दिला. तरी देखील तरुणीने कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन तरुणासोबत लग्न केले. (Latest Marathi News)

मात्र, ज्याच्यासाठी या तरुणीने घर सोडले त्यानेच तिचा जीव घेतला. लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यानंतरच तरुणाने तिची हत्या केली आणि मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला. जेव्हा आपल्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी तरुणीचे आई-वडील तिच्या घरी गेले. तेव्हा तिच्या घराला लॉक लावलेले होते. शेजारच्यांकडे विचारणा केली असता, तरुणीचा दोन दिवसांपूर्वीच आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

Uttar Pradesh Crime News A husband who had a love marriage killed his wife in Gurugram
Ambernath Crime News: अंबरनाथ हादरलं! मूलबाळ होत नसल्यानं पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य

या संपूर्ण प्रकरणानंतर तरुणीच्या आई वडिलांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच मेडिकल पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे कोणीही आढळून आले नाही. सासरचे लोक पळून गेले आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये घडला आहे.

दीपा असं मृत तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) पती साजन उर्फ गौरव याच्यासह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपा ही हरियाणातील गुरूग्रामधील रहिवाशी असून ती एका खासगी रुग्णालयात काम करत होती.

वर्षभरापूर्वी दीपाची ओळख आरोपी गौरवसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. गौरव हा गुरुग्राममधील एका कंपनीत सुपरवायझर होता कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दीपाच्या कुटुंबियांना तिच्या प्रेमाची कुणकुण लागली तेव्हा त्यांनी या गोष्टीला विरोध केला. (Breaking Marathi News)

Uttar Pradesh Crime News A husband who had a love marriage killed his wife in Gurugram
Jalgaon News: झोक्यातून बाळ पडू नये म्हणून आईने काळजीपोटी रुमाल बांधला; फास लागल्याने अनर्थ घडला

मात्र, तरी देखील दीपाने आई-वडिलांचा एकही शब्द न ऐकता गौरवसोबत कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर दीपा गौरवसोबत शेरगढी येथे राहू लागली होती. दीपाची आई अनिता यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमविवाहानंतर आम्ही माघार घेतली होती. दीपाशी रोज फोनवर बोलणे व्हायचे. रविवारपासून दीपाचा मोबाईल लागत नव्हता.

यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला हे समजले की तिचा मृत्यू झाला आहे. जेव्हा आम्ही दीपाच्या सासरी गेलो तेव्हा कळाले की, तीन दिवसांपूर्वी दीपाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे गौरवच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, दीपाच्या कुटुंबियांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तेथे कोणीही आढळून आले नाही. सासरचे लोक पळून गेले. सध्या दीपाच्या नातेवाईकांना मेरठला बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलीस सविस्तरपणे माहिती घेत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com