Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: ब्रेकिंग! मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी वेळ वाढवून द्यावा.. राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारला विनंती

Maratha Aarkshan Latest News: मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. १४ फेब्रुवारी २०२४

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची आणि मोठी बातमी. मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ वाढवून मागितला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे.

या मागणी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होऊन विशेष अधिवेशन कधी घ्यायचे यावर शिक्कामोर्तब होण्याची आज दाट शक्यता आहे. या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री गण उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगेंची प्रकृती खालावली!

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील 'त्या' खासदार आणि पीएवर कारवाई व्हावी; भाजप आमदाराची मागणी

Phaltan Name History: फलटण शहराला नाव कसं पडलं? जाणून घ्या शिवकालीन जुना इतिहास

Satara Doctor Case : साताऱ्यात भाड्याच्या घरात राहणारी डॉक्टर महिला लॉजवर राहायला का गेली? धक्कादायक माहिती समोर

Shocking: जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चाकूचा धाक दाखवत भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले

Maharashtra Live News Update: एक तारखेआधी जमीन व्यवहार रद्द करा; जैन मुनींची मागणी

SCROLL FOR NEXT