Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

Maratha Reservation Update: शरीराला त्रास देऊन हा लढा देण्याचा उपयोग होणार नाही. जरांगेंनी जालन्यातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढावावी आणि त्यातून हा प्रश्न मार्गी लावावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam Digital
Published On

Maratha Reservation

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषनाला अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. आरक्षणावरून फसवणूक सुरू असल्याचं म्हटलं आहे. शरीराला त्रास देऊन हा लढा देण्याचा उपयोग होणार नाही. जरांगेंनी जालन्यातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढावावी आणि त्यातून हा प्रश्न मार्गी लावावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांकडून बंद पाळण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना आवाहन करताना, ओबीसीच्या ताटातलं आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगासाठी विशेष अधिवेशन बोलावलं असून लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्याव लागेल. हे फसव राजकारण आहे का कळत नाही आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: ब्रेकिंग! मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी वेळ वाढवून द्यावा.. राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारला विनंती

जरांगे निवडून येतील याची खात्री

जरांगे पाटील यांना निरोप दिला आहे, त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याला अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. आता महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे.गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे.

Maratha Reservation
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com