मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरवाली सराटी येथे दाखल झालं आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत राज्य सरकार सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण माघार घेणार नाही, अशी भूमिका जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे डॉक्टरही चिंताग्रस्त आहे. नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी तातडीने आपलं उपोषण मागे घेऊन अन्न तसेच पाणी घ्यावं, अशी मागणी मराठा बांधव करीत आहेत. (Latest Marathi News)
दुसरीकडे, प्रशासकीय अधिकारी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले आहेत. अधिकाऱ्यांकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरांगे यांनी कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा अन् मगच माझ्याकडे या, अशी भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. १५ तारखेचे अधिवेशन २० पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांना इथून निघून जाण्याचं सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.