Accused Krish Shinde Escapes Police Custody Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: पोलिसांच्या हातावर तुरी, क्रिशने ठोकली धूम; दुचाकीवरून फरार होताना CCTV मध्ये कैद| VIDEO

Accused Krish Shinde Escapes Police Custody: नाशिकमध्ये आरोपीने पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये पोलिस ठाण्याजवळून आरोपीने सिनेस्टाईलने धूम ठोकली. नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिश शिंदे असे आरोपीचे नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. आरोपीला न्यायालयातून पोलिस ठाण्यात परतत आणत असताना शासकीय वाहनातून उतरून तो फरार झाला. पोलिस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीने आरोपीने पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे हा काल सायंकाळी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाल्याची घटना घडली. क्रिशला नेण्यासाठी त्याच्या एक साथीदार दुचाकीवरून आला होता. क्रिशने पोलिसांना चकवा देत पळ काढला आणि दुचाकीवर बसून फरार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशिर झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन परिसरात क्रिश शिंदे याने एकावर कोयत्याने हल्ला केला होता. भद्रकाली पोलिसांनी क्रिश शिंदेला अटक केली. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र पुन्हा भद्रकाली पोलिस ठाण्यात आणताना क्रिश शिंदेने पोलिसांना चकवा देत पळ काढला.

पोलिस ठाण्याच्या आवारातून आरोपी पळून गेला. आरोपी पळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांची चांगलीच धांदड उडाली. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलिस ठाण्याच्या बाहेर एक तरुण दुचाकी घेऊन उभा आहे. तेवढ्यात आरोपी क्रिश पळत पळत येतो आणि दुचाकीवर उडी मारून बसतो. क्रिशच्या मागे चार पोलिस पळत जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी एक पोलिस अक्षरश: कोलांट्या उड्या मारून रस्त्यावर पडतो. पण क्रिश दुचाकीवरून सुसाट पळून जातो. भद्रकाली पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र अद्याप आरोपी अद्याप सापडला नाही. क्रिशला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT