Nashik Crime : पोटच्या पोराचा गळा घोटला, बापाने मृतदेह गोणीत भरुन सासरवाडीत पलंगावर फेकला; नाशिक हादरलं

Nashik Crime News : नाशिकमध्ये अतिशय थंड काळजाने बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलाला गळा आवळत संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर मुलाला गोणीत भरत सासूरवाडीला नेत तिथल्या पलंगावर टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Nashik Amrapali Father son killed
Nashik Amrapali Father son killedSaam Tv News
Published On

नाशिक : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पुणे किंवा नाशिक शहरात दिवसाढवळ्या हत्या होत असल्याचं समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. बाप मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका वडिलाने रागाच्या भरात आपल्या ९ वर्षांच्या मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नाही तर बापाने हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत टाकून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ३५ वर्षीय सुमित पुजारी असं मुलाच्या आरोपी वडिलांचं नाव आहे. या घटनेनंतर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नाशिकमध्ये अतिशय थंड काळजाने बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलाला गळा आवळत संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत भरत सासूरवाडीला नेत तिथल्या पलंगावर टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक हादरलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सध्या सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं आहे. सुमित पुजारी असं आरोपी वडिलाचे नाव असून त्यांनी आपल्या मुलगा गणेश पुजारी याची हत्या केली.

Nashik Amrapali Father son killed
Bhandara News : नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन लेकीचं लग्न, कन्यादानानंतर वडिलांना हार्ट ॲटॅक; आनंदी घरावर दु:खाचं सावट

दरम्यान, नाशिकमध्ये काल अशीच एक हत्येची घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबडमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना घडली. नाशिकच्या अंबडमधील कामटवाडा परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. अल्पयवयीन मुलाच्या हत्येने नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या कामटवाडा येथे एका १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना घडली. नाशिकमध्ये सोमवारी दुपारच्या वेळेस ही घटना घडली. पोलीस तपासात या हत्याकांडातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांमध्ये वादाचा भडका उडाला.

कामटवाड्यात करण चौरे या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. १० दिवसांपूर्वीच तो बाल सुधारगृहातून सुटून आला होता. ८ मार्चला संत कबीरनगरात अरुण बंडी याचा करण चौरेसह सहा संशयितांनी दगडाने ठेचून हत्या केली. त्याचा बदला घेत बंडीच्या गँगमधील चिमण्या आणि सहा साथीदारांनी त्याच पद्धतीने करणला डोक्यात दगड घालून संपवलं.

Nashik Amrapali Father son killed
Crime News : मैत्री तुटली, बर्थडेला दिलेलं गिफ्ट घ्यायला मुलीच्या घरी, मैत्रिणीसह अख्ख्या सोसायटीनं मुलाला चोपलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com