Nashik Crime : २ गटातील तुंबळ हाणामारीत मुलाच्या डोक्यात दगड, दिवसाढवळ्या नाशिकच्या रस्त्यावर रक्तरंजित थरार

Minor Boy Killed in Broad Daylight: कामटवाडे परिसरात दिवसाढवळ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Nashik
Nashik Saam
Published On

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कामटवाडे परिसरात दिवसाढवळ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

किरण चौरे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरात दोन गटात दिवसाढवळ्या वाद सुरू होता. दोन गटातील वादानंतर विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या डोक्याता दगड घालण्यात आला. तसेच त्याला मारहाणही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik
'दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ नाही, सरकार लोकांना भरकटवतंय', काँग्रेस नेत्याचा आरोप; फडणवीस म्हणाले 'जखमेवर मीठ..

हत्या केल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. मुलाचा रक्ताने माखलेला मृतदेह तेथेच पडून होता. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Nashik
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त, पाहा तुमच्या शहरात आजचा दर काय?

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन गटातील हाणामारीत विधीसंघर्षग्रस्त बालकाची डोक्यात दगड घालून का हत्या केली? मुलाची हत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com