BJP Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राजकीय घराणेशाहीला भाजपकडून 'ब्रेक'; महापालिकेच्या रिंगणातून नेत्यांचे नातेवाईक आऊट?

Maharashtra Political News : कोल्हापूर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कृष्णराज महाडिकांनी अखेर माघार घेतलीय...मात्र ही माघार घेण्यामागे आहे तो भाजपच्या संसदीय समितीने घराणेशाहीबाबत घेतलेला निर्णय.... भाजपनं आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धनंजय महाडिकांनी दिलीय..

Bharat Mohalkar

खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात... मात्र आता कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सतरंज्याचं ओझं देत सत्तेचा मलिदा खाण्यासाठी आमदार, खासदारांची मुलं, पत्नी, भाऊ रिंगणात उतरत आहेत.. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपातच घराणेशाही फोफावत असल्यानं भाजपच्या कोअर कमिटीच्या गुप्त बैठकीत आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचं सूत्र ठरलं... आणि आता त्याची अंमलबजावणीही सुरु झालीय...

कृष्णराज महाडिकांनी पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून निवडणुकीतून माघार घेतलीय... तर आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदे आणि सीमा हिरेंची मुलगी रश्मी हिरेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचं जाहीर केलंय...दुसऱ्या बाजूला पक्षाचा आदेश धाब्यावर बसवून महापालिकेच्या उमेदवार यादीत घराणेशाहीचाच गवगवा दिसून आलाय...

मुंबई

राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष

मकरंद नार्वेकर

भाऊ

हर्षिता नार्वेकर

वहिनी

नाशिक

सीमा हिरे

आमदार

योगेश हिरे

दीर

नाशिक

अपूर्व हिरे

माजी आमदार

योगिता हिरे

पत्नी

देशभरात 149 कुटुंबात आमदार आणि खासदार ही दोन्ही पदं आहेत... त्यातच नगरपालिका निवडणुकीतही आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या नातेवाईकांनी घुसखोरी केलीय... आता पुन्हा महापालिका निवडणुकीतही पक्षाचाच आदेश डावलून आमदार, खासदार, मंत्र्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार असेल तर कार्यकर्त्यांनी स्वाभिमान गहान टाकून गुलामासारख्या सतरंज्याच उचलायच्या का? असाच प्रश्न निर्माण झालाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! आजही सोनं झालं स्वस्त; प्रति तोळा तब्बल ३५०० रूपयांनी घसरण; वाचा २२,२४ कॅरेट आजचे दर

Nagpur : सकाळी काँग्रेसची साथ सोडली, रात्री भाजपातून उमेदवारीचा अर्ज भरला; नागपुरात राजकारण ३६० डिग्री फिरलं!

Gautam Gambhir: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? अखेर BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलं उत्तर

Pune-Mumbai Places: लोणावळा, खंडाळा कशाला जाताय? पुण्या-मुंबईजवळची 'ही' 5 ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट

Marathi Actress Arrested: 'आमच्या कुटुंबाशी तिचा संबंध...'; सुनेच्या अटकेवर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची ठाम प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT