मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

BMC ELection : मुंबईत राजकारण चांगलंच तापलं आहे. आतापर्यंत उमेदवार अर्ज घेतलेल्यांची आकडेवारी हाती आली आहे.
BMC Election news
BMC Election Saam tv
Published On
Summary

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय

आतापर्यंत ४०१ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केलाय

पाच दिवसांत ११,५६८ अर्जांचे वितरण करण्यात आलंय

अखेरच्या दिवशी मोठ्या गर्दीची शक्यता आहे

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेतही चांगलीच चुरस दिसून येत आहे. सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील २३ निवडणूक निर्णय अधिकारी (RO) कार्यालयांमधून एकूण १ हजार २२५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. याच दिवशी ३५७ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. आजअखेर दाखल अर्जांची संख्या ४०१ वर पोहोचली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू झाले आहे. उद्या, मंगळवार दिनांक ३० डिसेंबर २०२५ हा अखेरचा दिवस असून सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अर्जांचे वितरण, तर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पाच दिवसांत ११,५६८ अर्जांचे वितरण

निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज उचलले आहेत.

निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज उचलले आहेत.

▪️ २३ डिसेंबर – ४,१६५ अर्ज

▪️ २४ डिसेंबर – २,८४४ अर्ज

▪️ २६ डिसेंबर – २,०४० अर्ज

▪️ २७ डिसेंबर – १,२९४ अर्ज

▪️ २९ डिसेंबर – १,२२५ अर्ज

या पाच दिवसांत एकूण ११,५६८ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष दाखल अर्जांची संख्या तुलनेने कमी आहे. शेवटच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

कोणत्या विभागात किती अर्ज?

आजच्या दिवशी दाखल झालेल्या ३५७ अर्जांमध्ये के पश्चिम, पी उत्तर, ए + बी + ई, जी उत्तर, टी आणि पी पूर्व विभागांमध्ये तुलनेने जास्त प्रतिसाद दिसून आला.

▪️ के पश्चिम (RO ७) – २९ अर्ज

▪️ पी उत्तर (RO ४) – २९ अर्ज

▪️ ए + बी + ई (RO २३) – २६ अर्ज

▪️ एन विभाग (RO १३) – २३ अर्ज

तर काही विभागांत अद्याप मोजक्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, अखेरच्या दिवशी जोरदार हालचाल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

BMC Election news
राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे

नामनिर्देशन प्रक्रियेतील ही आकडेवारी पाहता, यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षीय उमेदवारांसोबतच अपक्षांचीही मोठी संख्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने, अनेक प्रभागांत थेट आणि तिरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष मंगळवार, ३० डिसेंबर या अखेरच्या दिवसाकडे लागले आहे. त्या दिवशी उमेदवारांची आणि समर्थकांची गर्दी निवडणूक कार्यालयांत पाहायला मिळणार, हे मात्र नक्की आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com