राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

mns probable candidate list mumbai bmc : राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर आलीये. जाणून घ्या कोणाला कुठून संधी मिळण्याची शक्यता आहे.
MNS Probable Candidate List update
MNS Probable Candidate List Saam tv
Published On

राज्याच्या राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची मोठी परीक्षा असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंकडून गनिमी कावा सुरू झाला आहे. उमेदवार फोडोफोडीच्या शक्यतेमुळे दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नसल्याची चर्चा आहे. एकीकडे ठाकरे गटाने ६६ जणांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे. तर मनसेने १५ उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचे सांगण्यात आलं आहे. कोणाला कुठून मिळाली संधी, जाणून घ्या.

मनसेने 15 उमेदवारांना AB फॉर्म दिले

१) वार्ड १९२ - यशवंत किल्लेदार

२) वार्ड १८३ - पारूबाई कटके

३) वॉर्ड ८४ - रूपाली दळवी

४) वॉर्ड १०६ - सत्यवान दळवी

५) वॉर्ड ६८ - संदेश देसाई

६) वार्ड २१- सोनाली देव मिश्रा

७) वॉर्ड ११ - कविता बागुल माने

८) वॉर्ड १५० - सविता माऊली थोरवे

९) वॉर्ड १५२ - सुधांशू दुनबाळे

MNS Probable Candidate List update
Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

१०) वॉर्ड ८१ - शबनम शेख

११) वॉर्ड १३३ - भाग्यश्री अविनाश जाधव

१२) वॉर्ड १२९ - विजया गीते

१३) वॉर्ड १८ - सदिच्छा मोरे

१४) वॉर्ड ११० - हरिनाक्षी मोहन चिराथ

१५) वॉर्ड २७ - आशा विष्णू चांदर

मनसेची रणनीती काय?

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असतानाही मनसेने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. जोपर्यंत सर्व उमेदवार अर्ज दाखल करत नाहीत, तोपर्यंत मनसेकडून जाहीर केली जाणार नसल्याची मनसेची रणनीती आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत गुप्तता पाळण्याची मनसेची रणनीती असणार आहे. युतीच्या घोषणेवेळी राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्याचा भान ठेवून मनसे नेत्यांकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे. मूल पळवणारी टोळी सध्या फिरत आहेत, अशी टीका देखील राज ठाकरेंनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com