Tanaji Mutkule allegations on Santosh Banga Saam TV marathi news
महाराष्ट्र

संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Tanaji Mutkule allegations on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघात भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Namdeo Kumbhar

  • भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केला.

  • गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

  • जायभाये आत्महत्येच्या प्रकरणावरही मुटकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला.

  • मुटकुळे यांनी बांगर यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा केला.

BJP MLA Tanaji Mutkule Serious Allegations Against Santosh Bangar : हिंगोलीमधील कळमनुरीचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवतात. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली, अनेक महिलांसोबत बांगर यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तान्हाजी मुटकुळे आणि संतोष बांगर या सत्ताधारी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. भाजप आमदार मुटकुळे यांनी संतोष बांगर यांनी शिंदेंकडून ५० खोके घेतल्याच्या आरोप केला होता. आता त्यामध्ये आणखी भर पडली असून संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. जायभाये नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप -

अश्लील शब्दाची सुरूवात कुणी केली हे, हा एक प्रश्न आहे. कळमनुरी काय झालेय, हे आमदराने (संतोष बांगर) तपासले पाहिजे. जायभाय नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. तलाठी म्हणून असणाऱ्या तिच्या नवऱ्याच्या संदर्भात, बायाच्या संदर्भात कळमनुरीमध्ये चर्चा आहे. त्यामुळे तो आता हिंगोलीत प्रयत्न करत आहे. कळमनुरीत आपण काय करतो, तिथे किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवतो, हे तपासले पाहिजे. हे सर्व रेकॉर्ड आपल्याला आहेत, असा खळबळजनक आरोप तान्हाजी मुटकुळे यांनी केला.

संतोष बांगर यांचा पलटावर

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला. यावर आता संतोष बांगर यांनी माझ्यासाठी परस्त्री मातेसमान असल्याचे सांगत भाजप आमदार तानाजी मुटकुळे शेण खातात, त्यांना लोकांनी घरात देखील बोलावू नये असं म्हटले आहे.

संतोष बांगरांना विकासच माहिती नाही -

विकास हा त्यांना (संतोष बांगर) नावाने माहिती नाही. कळमनुरी नगरपरिषदेत त्यांना येऊ देत नाही. विकास हा शून्य आहे. कळमनुरीतल्या स्मशानत जायला रस्ता नाह, अशी अवस्था आहे. हिंगोलीत बांगर चौथ्या क्रमांकावर जाणार. कळमनुरीमध्ये कोणताही विकास नाही. बांगर यांच्याकडे विकासाचे व्हिजिन नाही. इथे स्मशानात जायलाही रस्ता नाही, असा टोलाही यावेळी मुटकुळे यांनी लगावला.

पैशाच्या बळावर निवडणूक लढवतोय -

या निवडणुकीत काहीही दम नाही. ही निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. संतोष बांगर यांचा दारूण पराभव होणार आहे. आमची खरी लढत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आहे. संतोष बांगर हे तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर जातील. विकासाचे व्हिजन नसलेला माणूस फक्त पैशाच्या बळावर निवडणूक लढवू लागला, तर लोकांना हे पैसे कशाचे आहेत, हा पैसा कुठून आलेला आहे लोकांना माहिती आहे, असा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Crime: ६५ वर्षीय महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार; २४ वर्षांच्या तरुणाचं हैवानी कृत्य

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? तर कॅरेक्टर ठेवा चांगलं; सिबिलसह तपासलं जाणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

Gas Leak Safety: घरात गॅसचा वास येत असेल तर, 'या' ५ चुका करू नका, मोठा स्फोट होईल

SCROLL FOR NEXT