महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? महायुती फुटणार, शिंदे-पवार एकत्र येणार?

Maharashtra politics: महायुतीत नाराजीनाट्य सुरु असतानाच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत.. मात्र आता खरंच शिंदे भाजपची साथ सोडणार का? आणि राज्यात नवी समीकरणं तयार होणार का?
Shashikant Shinde’s remarks reignite speculation about a possible Shinde–Pawar alliance amid rising tensions in the Mahayuti.
Shashikant Shinde’s remarks reignite speculation about a possible Shinde–Pawar alliance amid rising tensions in the Mahayuti.Saam Tv
Published On

भाजपनं शिंदेसेनेविरोधात ऑपरेशन लोटस सुरु केल्यानं महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगलीय... त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत.. एकनाथ शिंदेंसोबत एकत्र आलो आहोत, ही भविष्याची नांदी असू शकते म्हणत शिंदेसेनेसोबतच्या युतीचे संकेतच दिले आहेत. विशेष म्हणजे शिंदेसेनेनंही याला विरोध दर्शवलेला नाही.

खरंतर कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीने युती केलीय.. या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी शशिकांत शिंदेंनी साताऱ्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंसोबतच्या युतीचे संकेत दिलेत... मात्र पवारांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याचा दावा दानवेंनी केलाय.. तर छोट्या युतीमुळे शशिकांत शिंदेंनी हुरळून जाऊ नये, असा टोला भाजपनं लगावलाय....

खरंतर याआधीही एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमधील जवळीक दिसून आलीय.. ठाकरेंसोबत आघाडीत असतानाही शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्काराने एकनाथ शिंदेंना गौरवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा शशिकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंसोबतच्या युतीचे संकेत दिलेत... मात्र पवार आणि शिंदेंच्या युतीचे काय राजकीय परिणाम होऊ शकतात?

भाजपमध्ये होणाऱ्या कोंडीपेक्षा पवारांसोबत जाऊन विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं

पवार आणि शिंदेंच्या युतीमुळे मराठा फॅक्टर मजबूत होऊ शकतो

नव्या समीकरणामुळे भाजपसमोर तगडं आव्हान उभं राहू शकतं

शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष चव्हाट्यावर आलाय.. तर भाजपविरोधात टोकाची भूमिका न घेणाऱ्या शिंदेंनी आता भाजपला शिंगावर घ्यायला सुरुवात केलीय.. त्यामुळे शिंदे भाजपशी काडीमोड घेऊन पवारांशी संधान साधणार का? यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com