हिंगोलीतील राजकारणात संतोष बांगर यांच्यावर ५० कोटी घेतल्याचा गंभीर आरोप.
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी हा दावा मुलाखतीत केला.
शिवसेना फुटीच्या काळातील ‘५० खोके ओके’ घोषणेची आठवण पुन्हा ताजी.
बांगर आणि मुटकुळे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय पारा वाढलाय.
Tanaji Mutkule allegation on Shiv Sena MLA Bangar 50 crore from Eknath Shinde : शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक नेत्याला ५० कोटी रूपये दिल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून कऱण्यात येत होता. संतोष बांगर शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये गेले नव्हते. पण पण अखेरच्या क्षणी अविश्वास ठरावाच्या वेळी बांगर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता याच संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदारांनी गंभीर आरोप केला आहे. भाजप आमदाराच्या या आरोपावर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय.
हिंगोलीमधील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० कोटी रूपये घेतले, असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी विरोधकांकडून ५० खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. संतोष बांगर अखेरच्या क्षणी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते.
पन्नास खोके ही घटना सत्य आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडून पन्नास कोटी रुपये घेतले आहेत, असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. ते साम टीव्हीसोबत बोलताना बांगर यांच्याबाबत दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झालाय. हिंगोलीमध्येही बांगर आणि मुटकुळे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता भाजप आमदाराने संतोष बांगर यांच्यावर ५० कोटींचा गंभीर आरोप केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.