Ram Shinde-Vike Patill
Ram Shinde-Vike Patill Saam TV
महाराष्ट्र

Political News : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; राम शिंदेंचा विखे पिता-पुत्रांविरुद्ध गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषद निवडणुकीपासून राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे  यांच्यात सुप्त वाद होता. आता मात्र हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत विखे यांचे समर्थक रोहित पवार यांच्या गटाकडून निवडणुकीत उतरले आणि निवडूनही आले.

सभापती निवडीत राधाकृष्ण विखे पाटील आपल्या समर्थक संचालकांना भाजप गटात आणतील, अशी अपेक्षा असताना शेवटपर्यंत तसं झालं नाही. शेवटी ईश्वरचिठ्ठीतून आमदार राम शिंदे गटाच्या शरद कारले यांची सभापती पदासाठी निवड झाली.

कारले यांचा सत्कार करताना राम शिंदे यांनी विखे विरोधात असलेली सगळी खदखद बोलून दाखवली. एवढेच नाही तर विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात काम करत असल्याचा गंभीर आरोपही राम शिंदे यांनी केला.

जामखेड बाजार समिती निवडणुकीत काय झालं?

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही राम शिंदे आणि  रोहित पवार गटाचे समसमान 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण

Manjra Dam : मांजरा धरणात आता १० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; अनेक भागात मोठ पाणीसंकट

UBT Vs INC : मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अनिल देसाईंना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला विरोध?

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका, १८ मे रोजी मुंबईत होणार ४ सभा

PM Modi Rally: महायुतीच्या प्रचारसभेत तरुण शेतकरी आक्रमक; कांद्यावर बोला शेतकऱ्यांच्या घोषणा

SCROLL FOR NEXT