ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण असणे खूप महत्वाचे आहे. ते शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास काय होते. जाणून घ्या
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो, ज्यामुळे सुस्ती येते.
व्हिटॅमिन डीचा थेट संबंध कॅल्शियमची असल्यामुळे हाडांमध्ये वेदना होऊ शकतात.
तसेच व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे केस देखील गळू लागतात.
जर तुमची व्हिटॅमिन डीची पातळी खूप कमी झाली असेल तर, डिप्रेशन येण्याची शक्यता असते.
व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी केळी, संत्री, मासे, अंडी, किवी, पपई आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.
ज्या व्यक्तीचे व्हिटॅमिन डी कमी आहे त्यानी सूर्यप्रकाशात जाऊन बसा आणि सूर्यप्रकाश घ्या. असे केल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन निघण्यास मदत होते.