Nitesh Rane Vs Manoj jarange Patil Saamtv
महाराष्ट्र

Nitesh Rane News: 'देवेंद्र फडणवीसांवर टीका कराल तर...' नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा

Nitesh Rane Vs Manoj jarange Patil: "मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलत रहाल तर आम्ही तुमचं स्वागत करू. मात्र फडणवीसांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही.. असे नितेश राणे म्हणालेत.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, मुंबई| ता. १० डिसेंबर २०२३

Nitesh Rane On Manoj Jarange Patil:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटलांच्या सभांचा धडाका सध्या राज्यभर सुरू असून ते या सभांमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच छगन भुजबळांवर टीका करताना दिसत आहेत. वारंवार फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधत फडणवीसांवरील टीका खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हणले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

"मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका कराल तर आम्ही कधी सहन करणार नाही. फडणवीसांवर टीका कराल तर आम्हालाही तुमच्या डोक्यात विष कोण टाकत आहे? तुमची भाषण कोण लिहून देत आहे? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतय याची पुराव्यासकट यादी काढावी लागेल..." असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणालेत.

....तर गाठ मराठ्याशी

"मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलत रहाल तर आम्ही तुमचं स्वागत करू. ज्या देवेंद्र फडणवींसानी मराठा समाजासाठी टिकणार आरक्षण दिले. मराठा समाजासाठी असंख्य योजना जाहीर केल्या. त्यांच्याविरोधात तुम्ही भूमिका घ्यायला सुरु कराल तर गाठ या मराठ्याशी आहे हे लक्षात राहू दे.." असा इशाराही त्यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले होते जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमधील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली होती. "फडणवीसांनी आता तरी शहाणं व्हावं, नाही तर मी सगळं बाहेर काढणार. त्यांनी खोड्या करायला सुरूवात केली आहे. हे मीच घडवून आणतोय, असं त्यांनी सांगावं.." असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

Maharashtra Live News Update : नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस

Bollywood Divorce: बॉलीवूडमधील सगळ्यात महागडे घटस्फोट, पोटगी जाणून व्हाल थक्क

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

SCROLL FOR NEXT