Chhattisgarh Accident: सुखी संसार सुरू होण्याआधीच सर्व संपलं! लग्नाहून परतताना भीषण अपघात; नवरा नवरीसह ५ जणांचा मृत्यू

Chhattisgarh Car Accident: छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Chhattisgarh Car Accident
Chhattisgarh Car AccidentSaamtv
Published On

Janjgir Champa Accident:

छत्तीसगडमधून एक मोठी अपघाताची घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जांजगीर-चंपा जिल्ह्यात अपघाताची दुर्देवी घटना घडली. बलौदा येथील शुभम सोनी आणि शिवरीनारायण येथील नेहा यांचा शनिवारी रात्री विवाह सोहळा झाला. रविवारी सकाळी नवरा नवरी कारमधू घरी परतत होते. कारमध्ये नवरा-नवरीसोबतच कुटुंबातील आणखी तीन लोक होते.

त्यांची कार मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकारिया झुलन गावाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक (Accident) इतकी जोरदार होती की कारमधील नवरा- नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात नवरदेव गंभीर जखमी झाला होता, ज्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh Car Accident
Kalyan News : अन्यथा रस्ता होऊ देणार नाही; दुर्गाडी ते गांधारी दरम्यानच्या रिंगरोड बाधितांची मागणी

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करु लागले. तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या भयंकर घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवा संसार सुखी होण्याआधीच संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Chhattisgarh Car Accident
Allahabad HC News: पत्नीचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर वैवाहिक बलात्कार गुन्हा मानता येणार नाही : हायकोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com