Navneet Rana  saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana: 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

navneet rana receives death threat again: भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली.

Nandkumar Joshi

Summary:

  • भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

  • 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू' अशी धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली

  • अमरावती पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा केला दाखल

अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अमरावती पोलिसांना फोन करून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील त्यांना अनेक धमक्या आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेत्या नवनीत राणा यांना आज पुन्हा धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसापूर्वी मुलांना जन्माला घालण्यासंदर्भात माजी खासदार नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली. 'बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू .' अशाप्रकारची धमकी देण्यात आली.

या धमकीनंतर नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा फोन कुणी आणि कोणत्या ठिकाणावरून केला होता याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, याआधी २ नोव्हेंबरला नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हैदराबाद येथून अब्दुल नावाच्या व्यक्तीने स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवून नवनीत राणा यांना अश्लील भाषेत मजकूर लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याआधी हैदराबादच्या जावेद नावाच्या व्यक्तीकडून नवनीत राणा यांना सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास देखील पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम?

Donald Trump: मादुरोंनंतर आता अमेरिका खोमेनींचं अपहरण करणार? इराणच्या सर्वोच्च नेत्याला पकडणार?

Tuesday Horoscope : घराचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

SCROLL FOR NEXT