

Summary -
धारणीमध्ये प्रचारसभेत नवनीत राणा यांनी 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली
मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना 'माजी राहणार नाही' असा शब्द दिला
त्यांच्या नव्या राजकीय भूमिकेबाबत राज्यात मोठी चर्चा सुरू
'दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की मी पुन्हा येईल', असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच नवनीत राणा यांनी पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. धारणी येथील नगर परिषदेच्या प्रचार सभेत नवणीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ही इच्छा व्यक्त केली. 'बेटी बेटी को वापस लाना है की नही लाना है? दादा पराभव झाल्यानंतरही आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत प्रचारासाठी आलो. देवेंद्र भाऊ देवाभाऊ म्हणून तुम्ही महिलांच्या पाठीशी आहे त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे. आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही.' असे विधान नवनीत राणा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील नवनीत राणांना जाहीर सभेत शब्द दिला.
आज धारणी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सूचक वक्तव्य करत नवनीत राणा या माजी राहणार नाहीत असे जाहीर सभेत सांगितलं. यामुळे नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवणार किंवा मोठी कुठली तरी जबाबदारी मिळेल अशी चर्चा व्हायला लागली आहे. यावर नवनीत राणा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, देवाभाऊ राज्यातील सगळ्या महिलांच्या डोक्यावर हात ठेवून महिलांना विश्वास दिला आहे की सर्व महिलांच्या पाठीशी ते उभे आहेत.'
तसंच, 'भावासमोर बहिणींनी बोलणं काही नवल नाही आहे. यापूर्वी देवाभाऊंनी शायरी केली होती 'मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना, मै समंदर हू मै फिर लोट के आऊंगा' मी त्याच पद्धतीने देवाभाऊंसमोर माझं मत व्यक्त केलं. 'मै फिर आऊंगी. मी पुन्हा येईल' असं म्हटलं यात काही चुकीचं नाही. आणि माझ्या भावाने सांगितलं की नवनीत राणा या माजी राहणार नाही, असा माझ्या माहेरी येईन शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ हे शब्द पाळणारे आहेत.', असे नवनीत राणा यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.