Sharad Pawar Vs Girish Mahajan:  Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांचा नवा डाव! गिरीश महाजनांना रोखण्यासाठी मोहरा शोधला; बडा भाजप नेता 'तुतारी' हाती घेणार?

Sharad Pawar Vs Girish Mahajan: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीविरोधात डावपेच आखत आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. १६ सप्टेंबर

Jalgaon Jamner Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल असून महाराष्ट्र पिंजून काढत भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीविरोधात डावपेच आखत आहेत. अशातच आता शरद पवार यांनी भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधला आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शरद पवारांची नवी खेळी..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात शरद पवारांकडून मातब्बर चेहरा रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या गटात प्रवेश करुन दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्याविरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नेता तुतारी वाजवणार..

सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. ही यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. याच शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खोडपे हे तुतारी हाती घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. स्वतः शरद पवार या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात जळगावमध्ये तुतारी विरुद्ध कमळ असा हायहोल्टेज सामना होण्याची चिन्हे दिसत आहे.

कोण आहेत दिलीप खोडपे?

दरम्यान, दिलीप खोडपे हे जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते मानले जातात. ते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणुन ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मते आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी गिरीश महाजनांविरोधात मराठा कार्ड खेळण्याची रणनिती आखल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

SCROLL FOR NEXT