Maharashtra Politics : विधानसभा २ टप्प्यात? एकनाथ शिंदेंनी सांगितली निवडणुकीची तारीख, महायुतीच्या फॉर्मुल्यावर मोठं वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Politics
Published On

2024 Maharashtra Legislative Assembly election : महाराष्ट्रामध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राजकीय पक्षांची जुळवाजुळव आणि तयारी वेगात सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणूक अधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील असा अंदाज वर्तवला जात होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील, असे संकेत दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी रविवारी वर्षा निवसस्थानावर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. त्यावेळी त्यांनी राज्यातील निवडणुका आणि महायुतीच्या जागावाटपावर मोठं भाष्य केले.

निवडणुका कधी ?

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतात, असे संकेत एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. त्याशिवाय राज्यातील विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे त्याआधी एक एक महिना आचारसंहिता लागू शकते. म्हणजे, ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्मुला ठरलाय. लोकसभेतील स्ट्राइक रेट आणि निवडून येण्याची क्षमता, या निकषावर जागावाटप होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा मुख्य आधार असल्याचे भाजप नेते सांगत होते. आता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनीही भर टाकली आहे.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १५ पैकी सात जागांवर विजय मिळला होता.

काय म्हणाले एकनाथ शिंदे -

विधानसभेला उमेदवार निवड करताना तिन्ही पक्षांच्या सर्व्हेक्षणाचा विचार केला जाईल.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व्हेक्षणाच्या आधारावर जागावाटप झाले होते. त्याचा फटका बसला.

लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वात चांगलाय, त्याला जास्त जागा मिळाव्यात किंवा मिळतील.

महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्मुला लवकरच ठरेल.

विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पण अंतिम निर्णय निवडणूक आयोगाचा असेल.

Maharashtra Assembly Election 2024
Maratha Reservation: विधानसभा निवडणुकीआधी आरक्षण मिळवावंच लागेल, मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com