Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा

Dombivli Crime : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार दिल्याने एका शाळेविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाळेवर गुन्हा दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा
police Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आता याच विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक देण्यास नकार देणं एका शाळेला महागात पडलं आहे. शाळेने निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक देण्यास नकार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी डोंबिवलीतील शाळेने शिक्षक देण्यास नकार दिला. त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूरी केल्याचा ठपका ठेवत डोंबिवलीमधील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या शाळेने आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिला होता. त्यानंतर शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा
Pune Crime: पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम, वाहनांची तोडफोड आणि घरावर दगडफेक; हडपसरमध्ये तणावाचे वातावरण

अन् पोलिसांत गुन्हा दाखल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिला. त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागाचे दावडीसह डोंबिवली एमआयडीसी परिसराचे तलाठी लक्ष्मण नाना शिंदे यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून सिस्टर निवेदिता शाळेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा
Mumbai Crime : चेंबुर हादरलं! रिक्षा चालकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

निवडणुकीसाठी आढावा बैठक

मुख्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हातील आढावा घेण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी सर्व जिल्हातील कायदा आणि सुवस्था त्याच मतदान वेळी किती कर्मचारी आहेत, यांची माहिती घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com