Girish Mahajan News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविणार; मंत्री गिरीश महाजन

Nanded News : नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आले होते
Girish Mahajan
Girish MahajanSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: वडेट्टीवार काय म्हणतील यावर आमची युती अवलंबून नाही. वडेट्टीवार याचं लोक ऐकणार नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत. आम्ही शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात निवडणुका लढवणार आहोत. जागा वाटपाचा निर्णय, आमच्या तिन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठी घेतील; अशी प्रतिक्रिया ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घोडा मैदान समोर आहे. त्यावेळी समजेल कोणाच्या किती जागा येतील. परंतु महायुयीतून आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत आणि मोठ्या संख्येने आमच्या जागा निवडून येतील; अशा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Girish Mahajan
Onion Crop Insurance : कांदा पिकविम्यासाठी बोगस अर्ज; बीड जिल्ह्यात लागवड ५६७८ हेक्टर, विमा तब्बल २३ हजार हेक्टरचा

नुकसानीची तात्काळ मदत देण्याचे आश्वासन
नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला आहे. मागील अनेक वर्षात एवढा पाऊस झाला नाही. बहुतांश ९० टक्के भागात अतिवृष्टी झाली असून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व पंचनामे सुरू आहेत. पंचनामे सरकारकडे आल्यानंतर एनडीआरएफच्या निकषानुसार जी काही मदत करता येईल. ती जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन ग्रामीण विकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com