Maharashtra Politics : 'विरोधकांचा वापर करून, मोदींना संदेश'; गडकरींच्या PM पदाच्या ऑफरच्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाची तिखट प्रतिक्रिया

Reaction On Nitin Gadkari PM Post Offer Claim : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांनी त्यांना पीएम पदाची ऑफर दिली होती, असा दावा केलाय. यावरून आता ठाकरे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
नितीन गडकरींनी केला PM पदाच्या ऑफरचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics Saam Tv
Published On

मुंबई : विरोधी पक्षनेत्याने आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यावरून आता विरोधकांनी गडकरींचा खरपूस समाचार घेतल्याचं दिसतंय. विरोधकांनी हा दावा फेटाळला. गडकरींनी केलेल्या PM पद ऑफरच्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाची तिखट प्रतिक्रिया समोर आलीय.

ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, नितीन गडकरी हे त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी विरोधकांचा वापर करत आहेत. इंडिया आघाडीकडे देशाचे नेतृत्व करू शकतात, असे सक्षम नेते आहेत. त्यामुळे गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देण्याची गरज नसल्याचं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

ठाकरे गटाची तिखट प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की, नितीन गडकरी त्यांची दिल्लीच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षांच्या नावाने ते मोदींना इशारा आपला मेसेज देत आहेत. भारत आघाडीकडे अनेक सक्षम नेते आहेत. ते देशाचे नेतृत्व करू शकतात. भाजपकडून कोणताही नेता उधार नको, असं म्हणत त्यांनी (Priyanka Chaturvedi) गडकरींवर हल्लाबोल केलाय. नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्वमान्य नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा, असं त्यांना कोणी सांगितलं असेल असा मला वाटत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

नितीन गडकरींनी केला PM पदाच्या ऑफरचा गौप्यस्फोट
Nitin Gadkari Speech : युट्यूबवर केंद्रीय मंत्र्यांची धूम! एका गाण्यातून कमावले हजारो रुपये, नितीन गडकरींनी काय दिला संदेश?

गडकरींना पीएम पदाची ऑफर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरमध्ये एका कार्यक्रमातमाध्यमांना संबोधित करताना म्हटलं होतं की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एका विरोधी पक्षनेत्याने त्यांना, तुम्ही पंतप्रधान झालात (Nitin Gadkari PM Post Offer) तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. यावर गडकरी म्हणाले होते की, मी माझ्या संघटनेशी आणि विचारांशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी (Maharashtra Politics) पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत नितीन गडकरी यांचं देखील नाव होतं.

नितीन गडकरींनी केला PM पदाच्या ऑफरचा गौप्यस्फोट
Nitin Gadkari : विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नितीन गडकरी यांचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com