BJP leader Chandrashekhar Bawankule defends RSS; says those demanding a ban on the organization are “traitors to the nation.” saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Chandrashekhar Bawnkule On RSS: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना “देशद्रोही” आणि “मूर्ख” म्हटलंय. राष्ट्रवादाला प्रेरणा देण्यासाठी आणि राष्ट्राचे चारित्र्य घडवण्यासाठी आरएसएसने काम केल्याचं बानवकुळे भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणालेत.

Bharat Jadhav

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणाऱ्यांवर बावनकुळेंची सडकून टीका.

  • संघ ही राष्ट्रनिर्मिती करणारी प्रमुख संस्था असल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय.

  • बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक शब्दात सुनावलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख आहेत, असं बावनकुळे म्हणालेत. ते भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे व्यक्तीला राष्ट्र प्रेमाकडे, राष्ट्र निर्माणकडे घेऊन जाणारी या देशातली प्रमुख संस्था आहे. जो विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला आहे, त्या विचारावर हा संपूर्ण भारतात नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची जी राष्ट्र निर्माण करण्याची संकल्पना दिली आहे. आपल्या देशात जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र निर्माण कार्य करत आहे, त्याच्यावर बंदी आणण्याचा ध्येय असेल खरंतर ते मूर्खच लोक आहेत. त्यांना केवळ राष्ट्रहित, राष्ट्रभावना काही नाही. राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे हे लोक आहेत, अशा राष्ट्रद्रोही लोकांना जे संघावर बंदी आणण्याचा विचार करत आहेत. ते लोक राष्ट्रद्रोही आहेत, असा मी विचार करतो, अशी खोचक टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणाऱ्या लोकांवर केली.

शेतकऱ्यांना 32 हजार कोटींचं पॅकेज देणार महायुतीचं पहिलं सरकार

शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपये देणारा राज्यातील पहिले सरकार आहे. या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत एखाद्या तरी सरकारने शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं का? शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. आम्ही दावा करीत नाही, शेतकऱ्यांच पूर्ण नुकसान भरपाई होईल, पण ज्या प्रकारचं महाराष्ट्र सरकारनं जे पॅकेज दिलं ते शेतकऱ्यांना आधार देणार पॅकेज आहे.

पक्ष, कार्यकर्ते टिकवून ठेवायचे असल्याने चोरीचा आरोप

नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील. हे काँग्रेसचे मोठे नेते असतील हे खाजगीमध्ये हार मान्यच करतात. परंतु आता जनतेत दाखवाव लागते, समजा ते आता मत चोरी झाली नाही बोलले तर, त्यांचे कार्यकर्ते टिकून राहणार नाही. त्यांना त्यांचे कार्यकर्ते टिकून ठेवायचे आहे. आता तर जनता महायुतीच्या मागे उभी आहे. काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणी राहायला तयार नाही. त्यामुळे आपला पक्ष टिकवण्यासाठी कार्यकर्ते टिकविण्यासाठी आणि नेतृत्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT