
शरद पवार गटाकडून स्वतंत्र निवडणुकीची तयारी सुरू
मविआ आघाडीत फूट पडण्याची शक्यता वाढली आहे.
शरद पवार काँग्रेसला वगळून इतर सेक्युलर पक्षाला एकत्र आणणार आहे.
राज्यात आगामी स्वायत्त स्वराज्य संस्थेचा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महापालिकांच्या निवडणुकांसाठी महायुतीने रणनीती ठरवली आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होताना दिसत आहे. ठाकरे बंधूंना सामील करून घेण्यावरून काँग्रेस नेत्यांनी वेगळं मत मांडलंय. आता नागपूरमध्ये मविआत फाटफूट होताना दिसत आहे. तर नागपूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी मात्र वेगळीच चूल मांडण्याच्या तयारीत आहेत.
शरद पवार गट नागपुर जिल्ह्यात काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला असून सेक्युलर पक्षाला एकत्र केलं जाणार आहे. त्या सर्व सेक्युलर पक्षाला घेऊन निवडणुकीला सामोर जाण्यचा प्रयत्न करणार असल्यास शरद पवार गट राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे म्हणालेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तसेच गेल्या २०२४ च्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत दगाबाजी केली होती असा आरोप प्रवीण कुंटे यांनी केलाय. मित्रपक्ष उमेदवार असलेल्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष हा परस्पर उमेदवार देतो. आपल्याच कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यास प्रवृत्त करतो, असा आरोप सुद्धा कुंटे यांनी केलाय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये शीतयुद्ध पाहण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा आहे. पण काँग्रेस त्याच प्रामाणिकपणे आघाडी करणार असेल तरच आघाडी करू. जर त्यांची इच्छा नसेल तर आम्ही काँग्रेसला वगळून आघाडी स्थापन करू. त्यामुळे नागपूरमध्ये इतर जे काही सेक्युलर पक्ष आहेत, जसे की, प्रहार, आम आदमी असेल किंवा ठाकरे गट असेल तसेच इतर सामाजिक संघटना असतील त्यांना एकत्र करून नवीन सेक्युलर पक्ष आम्हाला तयार करता येईल का याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रविण कुंटे यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.