Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: मोठी बातमी! संजय राऊतांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; प्रकरण काय?

Loksabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका व्यक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अडचणीत आले असून भारतीय जनता पक्षाने संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी|ता. २२ मार्च २०२४

Maharashtra Politics News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष ताकदीने मैदानात उतरले असून राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका व्यक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अडचणीत आले असून भारतीय जनता पक्षाने संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. शिवसेना आणि आमच्या स्वाभिमाना विरोधात औरंगजेबी वृती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रात चाल करून येत आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊत यांच्या याच वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. तक्रार संजय राऊतांच विधान बदनामीकारक आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विद्वेष पसरवणारे असल्याचा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार गटाची निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली जाणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून अजूनही घड्याळ चिन्ह वापरलं जात असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वापरत आहेत अस लिहिलं जात नसल्याने ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT