Manoj Jarange Patil : प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil on Praniti Shinde : या सर्व घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्याचं समर्थन करणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

Beed :

माझ्यावर दहा-पंधरा गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा डाव आहे. हल्ला नेमका का केला, कोणी केला ? या संदर्भात मी अनभिज्ञ आहे. तरीही मी हल्ल्याचे समर्थन करणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी व्यक्त केली आहे.

Manoj Jarange Patil
Beed News: बीड जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यावर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

काँग्रेसने गुरुवारी लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर केली. या यादीत प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सरकोली गावात गेल्यावर त्यांच्या कारवर हल्ला झाला, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा त्यांनी आरोप केलाय.

या सर्व घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्याचं समर्थन करणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय.

तसेच फक्त मराठा आहे म्हणून जबाबदार धरणं चुकीचं आहे. याच्या पाठीमागे दुसरंही काही कारण असू शकतं. या संदर्भात मी अनभिज्ञ आहे, मात्र या हल्ल्याचा समर्थन नाही असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.

त्याचबरोबर बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं, असा डाव आखला आहे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून सर्वांनी बोध घ्यायला हवा. केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही. मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil
Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट; निलेश लंकेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच वाढला?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com