Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट; निलेश लंकेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच वाढला?

Loksabha Election 2024 : पक्ष बदलाच्या तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांकडून मिळत आहे.
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh LankeSaam Tv
Published On

सुशील थोरात | अहमदनगर

Ahmednagar Political News :

राज्यातील चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून सध्याचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली. मात्र निलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी जाहीर न झाल्याने आता चर्चा वाढू लागली आहे.

आता समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश लंके आपल्या पत्नी राणीताई लंके यांना याठिकाणी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.  (Latest Marathi News)

MLA Nilesh Lanke
Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची चर्चा कुठपर्यंत आली? 'वंचित'बाबत भूमिका काय?

पक्ष बदलाच्या तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके निवडणुकीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांकडून मिळत आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच वाढला आहे. तर निलेश लंके यांनाच उमेदवारी देण्यावर शरद पवार ठाम आहेत.

कोण आहेत राणीताई लंके?

निलेश लंके हे आपल्या पत्नी राणीताई लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात शिवस्वराज संवाद यात्रा काढून लोकसभा मतदारसंघातील सर्वच गाव-खेड्यापर्यंत ही शिवस्वराज यात्रा घेऊन गेले होते.

MLA Nilesh Lanke
Uddahv Thackeray : अस्सल पैलवान निवडून येणारच; उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगलीचा उमेदवार जाहीर

त्यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपणही इच्छुक असल्याचे वक्तव्य राणीताई लंके यांनी केले होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राणीताई लंके यांनी त्यांच्या गटामध्ये भरघोस निधी आणून मोठी विकास कामे केली आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध आमदार निलेश लंके की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उभ्या राहणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारासाठी आग्रही आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या उमेदवाराचा पेच कसा आणि कधी सुटणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com