Beed News: बीड जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यावर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Beed Breaking News: एप्रिल आणि मे महिन्यात चारा टंचाईचा जास्तीचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहेत.
Beed Breaking News:
Beed Breaking News: Saamtv
Published On

Beed Water Crisis:

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा गडद होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यात चारा टंचाईचा जास्तीचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यात (Beed) दुष्काळाच्या झळा गडद होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळं जिल्हयाबाहेर चारा वाहतूक करण्यास 31 ऑगस्ट रोजी मनाई आदेश काढण्यात आला होता, तो आदेश अद्याप कायम ठेवत असल्याचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात उपलब्ध होणारा सर्व प्रकारचा चारा इतर जिल्हयात वाहतुक करण्यास बंदी आणने, तसेच जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये, बीड जिल्हयात चारा टंचाई भासणार नाही, यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Breaking News:
Sambhajinagar Corporation : १ एप्रिलपासून खुले भूखंड, प्लॉटला लागणार कर; संभाजीनगर मनपाचा निर्णय

तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हादंडधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार बीड जिल्हयात उत्पादित होणारा किंवा सद्यस्थितीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूकबंदी आदेश पुढील आदेश येईपर्यंत जारी केला आहे. (Latest Marathi News)

Beed Breaking News:
Amol Mitkari News: महायुतीत नाराजी नाट्य! भाजपने हवेत राहू नये; अमोल मिटकरींचा खोचक टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com