Chief Minister Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

BJP Faces Setback as Congress: सांगलीमध्ये काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. काँग्रेसने सांगलीमधील १० पंचायत समित्यांपैकी ३ पंचायत समित्यांवर बाजी मारली. फक्त एका पंचायत समितीवर भाजपचा सभापती निवडून आला.

Priya More

Summary -

  • सांगलीमध्ये पंचायत समिती सभापती निवड पार पडली

  • काँग्रेसने सर्वाधिक ३ सभापतिपदे मिळवली

  • भाजपला काँग्रेसने मोठा धक्का दिला

  • विरोधक एकत्र आल्याने मिरज पंचायत समितीत काँग्रेस सत्तेत

विजय पाटील, सांगली

काँग्रेसने नाट्यमय घडामोडीत भाजपला धक्का देत अनपेक्षितरीत्या मिरज पंचायत समितीचे सभापतिपद पटकावले. त्यामुळे जिल्ह्यातील १० पैकी सर्वाधिक ३ पंचायत समित्‍यांचे सभापतिपद मिळवत काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटांनी अपेक्षेप्रमाणे प्रत्येकी दोन सभापतिपदे मिळवली. तर भाजपला केवळ जतच्या सभापतिपदावर समाधान मानावे लागले. मिरज वगळता सर्व तालुक्यात सभापती, उपसभापती निवड बिनविरोध झाल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांमध्ये मार्च २०२२ पासून प्रशासक राजवट होती. फेब्रुवारी महिन्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर एक महिन्याने आज सभापती निवडी पार पडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांनी या निवडीची प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे चार वर्षांची प्रशासक राजवट संपुष्टात आली. काँग्रेसचे पलूस आणि कडेगाव पंचायत समितीमध्ये बहुमत होते. त्यामुळे तेथे त्यांचे सभापतिपद निश्‍चित होते.

मिरजेत भाजपने २२ पैकी १० जागा मिळवून सत्तेच्या जवळ मुसंडी मारली होती. मात्र, भाजपला यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले आणि काँग्रेसला सभापती आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला उपसभापतिपद देत आघाडीने सत्ता हस्तगत केली आणि आमदार सुरेश खाडे यांच्या तोंडचा घास हिसकावत त्यांना धक्का दिला. या निवडीस शिवसेनेचे शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग इंगळे गैरहजर राहिले. त्यामुळे काँग्रेसला तिसरे सभापतिपद मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने वाळवा आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खानापूर आणि आटपाडीत सभापती स्थानापन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शिराळा व तासगावमध्ये सभापतिपद मिळवले आहे. भाजपला मात्र केवळ जत पंचायत समितीच्या सभापतिपदावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल ९ फेब्रुवारीस लागले. त्यावेळीच मिरज वगळता इतर ९ तालुक्यामध्ये विविध पक्षांनी बहुमत मिळवले होते. पलूस, कडेगावमध्ये काँग्रेस, खानापूर, आटपाडीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष जतमध्ये भाजप, वाळवा आणि कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, तासगावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांचे बहुमत होते. तर शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन बहुमत मिळवले होते. त्यामुळे या सर्व ठिकाणी सभापती, उपसभापती निवडी बिनविरोध झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Intake: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकतं?

Diabetes Symptoms: त्वचेवर दिसणारे 'हे' दोन डाग मधुमेह होण्याचे देतात संकेत

Maharashtra News Live Update: मनमाड-लासलगाव रस्त्यावर इंधन भरून जात असलेल्या टँकरचा अपघात

१६ वर्षांची कारकीर्द, १९३४६ धावा, ४८ शतके; मैदानातून बाहेर येताच 'रनमशीन' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा

Shocking: पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT