Chandrashekhar Bawankule Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा', CM पदावरुन भाजपने साधला निशाणा...

Chandrashekhar Bawankule On MVA CM Face: अशातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यां सुप्रिया सुळे तसेच रश्मी ठाकरेंचे नाव घेत राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत एक महत्वाचे विधान केले होते. यावरुनच आता भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १८ सप्टेंबर

Chandrashekhar Bawankule On Mahavikas Aghadi: एकीकडे विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे ज्यावर शरद पवार आणि काँग्रेसने मात्र मौन बाळगले आहे.

अशातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सुप्रिया सुळे तसेच रश्मी ठाकरेंचे नाव घेत राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत एक महत्वाचे विधान केले होते. यावरुनच आता भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे याना मुख्यमंत्री करायचे आहे, काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री फिरत आहेत, तर उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहेत, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला. 'शरद पवार यांना सुप्रिया सुळे याना मुख्यमंत्री करायचे आहे. काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री फिरत आहेत, तर उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहेत. नाना पटोले यांना मुख्यमंत्री केले आनंद आहे, पण आधी त्यांनी आरक्षणवार भुमिका स्पष्ट करावी. तसेच लाडकी बहीण योजना बंद करू," असेही काँग्रेसवाले म्हणतात, त्यावरही त्यांनी उत्तर द्यावे, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

महायुतीचा मुख्यमंत्री कोण?

तसेच "सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. निवडणूकीनंतर तिन्ही तिन्ही नेते पुढे ठरवतील, सध्या मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही, महाराष्ट्राचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे महाजन बोलले ते स्वाभाविक आहे," असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुनही महत्वाचे विधान केले.

लोकसभेची रणनिती सांगितली..

लोकसभेच्या आधी मोदी सरकारने देशासाठी काय योगदान दिले आहे ते आम्ही मांडले. पण जनतेला निवडणुकीत मतदान करताना विरोधकांनी कन्फ्युज केले. सरकारला मत दिले त्याचा हिशोब आम्ही 100 दिवसांनी जनतेला देणार आहे. केंद्रात सरकार 2029 पर्यंत सत्तेत आहे. महाराष्ट्रात सरकार आल्यास डबल इंजिन सरकार जोरदार काम करणार आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत आहे. आता 86 हजर कोटी वर्षाला आदिवासी भागासाठी देत आहे. काँग्रेसचा खोटारडेपणा दूर होईल. लोकसभा निवडणुकीत ठळक मुद्दे सांगताना 3 लाख कोटीचे काम 100 दिवसात सुरू झाले, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT