Maharashtra Politics:

Maharashtra Politics : आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Girish Mahajan News : यावेळी महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्यांने येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
Published on

2024 Maharashtra Legislative Assembly election : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर जर भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस असतील, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

यावेळी महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्यांने येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणार असेल, तर आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाजन यांनी यावेळी मविआवर टीका केली तर देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केले.

महाजन काय म्हणाले ?

महाराष्ट्र भाजपात एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. जर भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्रजी होतील. पक्षश्रेष्ठीना सर्व अधिकार आहेत. पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा असेल तर तो म्हणजे देवेंद्रजी असतील असं वक्तव्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.

१५ ते २० दिवसांत राज्यात आचारसंहिता लागेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय होईल, असंही ते म्हणाले.

आम्ही महायुती म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहोत. बहुमत आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पण आमचा मुख्यमंत्री होईल असं कोणी बोलू नये तो निर्णय महायुतीचा असेल असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.

मंगळवारी गिरीश महाजन यांनी नांदेडचे माजी खासदार चिखलीकर यांच्या गणरायाचे दर्शन घेतलं. त्यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. तब्बल 10 वर्षानंतर अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या घरी उपस्थिती लावली. हा दुग्ध-शर्करा योग असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com