Bhichukle Saam
महाराष्ट्र

Abhijeet Bhichukle: कसाय काम पच्चीस....अभिजीत बिचुकलेचा हटके लूक; २५ वर्षांनी बदलली हेअरस्टाइल, कॉन्फिडन्स जबरा

Abhijeet Bichukale New Hairstyle: अभिजीत बिचुकलेने 25 वर्षांनंतर त्याचा आयकॉनिक लूक बदलल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Bhagyashree Kamble

अभिजीत बिचुकलेने २५ वर्षांनंतर त्याचा आयकॉनिक लूक बदलल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस मराठी आणि हिंदीमध्ये चर्चेत राहिलेल्या बिचुकलेच्या हेअर स्टाईलची एक वेगळीच ओळख बनली होती. लांबसडक केस ही आयकॉनिक स्टाईल बनली होती. पण आता त्याने आपल्या स्टाइलमध्ये बदल करत शॉर्ट हेअरकट केला आहे. सध्या त्याच्या न्यू हेअर कटचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेचं नाव समोर आलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मोठे केस, हटके स्टाईल आणि रंगीबेरंगी विविध स्टाईलचे गॉगल. प्रत्येक आऊटफिटवर त्याचा हा लूक कायम असतो. पण सध्या बिचकुल्याने आपला लूक बदलला आहे.

हो, त्याने चक्क लांबसडक केस शॉर्ट केले आहेत. तब्बल २५ वर्षांनी त्याने आपला लूक चेंज केला आहे. हिंदी आणि मराठी बिग बॉसमध्ये त्याची चर्चा झाली होती. आता २५ वर्षांनी बदललेल्या लूकमुळे बिचुकले सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

नव्या लूकवर अभिजीत बिचुकले म्हणतो, 'गेली २५ वर्ष आपली तिच हेअर स्टाईल होती. आयकॉनिक हेअर स्टाईलनं संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलं. या लूकला २५ वर्ष झाल्यामुळे यावर हेअर स्टाईलिस्ट आणि मी विचार केला. नंतर हेअर कट केला. याच्यावर आता एकच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या..'

'२०१९ मध्ये बिग बॉस मराठीत भाग घेतला होता. तेव्हा माझी हेअर स्टाईल खूप गाजली. हिंदीबरोबर मराठी बिग बॉसमध्ये माझी हेअर स्टाईलचं कौतूक झालं. संपूर्ण भारताच्या तरूण पिढीला माझी हेअर स्टाईल लक्षात राहील. पण आता २५ वर्षांनी माझी हेअर स्टाईल बदललेली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT