Nashik News: 'मला दुसरी मुलगी आवडते, तुझ्याशी लग्न करणार नाही'; प्रियकराचा नकार, मुलीनं आयुष्यच संपवलं

Nashik Teenager Ends Life Over Boyfriends Refusal: नाशिकच्या शरणपूर रोड येथे १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Crime
CrimeSaam
Published On

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही

प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. तरूणाला दुसरी तरूणी पसंत पडल्याकारणाने त्याने प्रेयसीला लग्न करण्यास नकार दिला. या कारणामुळे तरूणीला मानसिक धक्का बसला आणि तिने टोकाचे पाऊल उचलले. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

नाशिकच्या शरणपूर रोडवर ही धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत प्रवीण पाटील असे प्रियकराचे नाव आहे. तर, मृत तरूणीचे वय १७ होते. अल्पवयीन मुलगी आणि संशयित आरोपी वेदांत यांचे प्रेमसंबंध होते. गेले अनेक वर्ष त्यांचे रिलेशनशिप होते. मुलीचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे कुटुंब लग्न लावून देणार होते.

Crime
Pune: पुणे - हावडा रेल्वेसेवा १२ दिवसांसाठी बंद, कोणती एक्स्प्रेस बंद अन् कोणती धावणार?

मात्र, वेदांतने प्रेयसीला लग्न करण्यास नकार दिला आहे. 'मला दुसरी मुलगी आवडते, तुझ्याशी लग्न करणार नाही' असं तरूणाने प्रेयसीला सांगितलं होतं. त्यानंतर तरूणीला मानसिक धक्का बसला. महिन्याभरापासून तिने आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरूणाने लग्न करण्यास नकारच दिला.

Crime
Crime: 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न, तरूणीनं सपवलं आयुष्य

मानसिक त्रास असह्य झाल्यामुळे तरूणीने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. अल्वयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, वेदांत प्रवीण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com