st employees  Saam tv
महाराष्ट्र

Good News: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, अन् घरभाड्याचा भत्ता ३ टक्के; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Maharashtra ST workers salary hike latest news: एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचसोबत घरभाड्याचा भत्ता देखील वाढवण्यात आला आहे.

Priya More
  • एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला

  • घरभाडे भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ जाहीर

  • ८६ हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे घरभाड्याचा भत्ता ३ टक्के करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत ही घोषणा केली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. एसटी महामंडळाच्या कामगारांनी संपाची घोषणा केली होती. आज सभागृहात बोलताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, ८६ हजार कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के करण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. घरभाड्याचा भत्ता ३ टक्के करण्यात आला. यासाठी ४५ कोटी रुपये अतिरिक्त भार येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले. परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत एसटी कर्मचाऱ्यांनी केले असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला. तर घरभाडे भत्ता ८, १६, २४ टक्क्यांवरून १०, २०, ३० टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ ही २ टक्केच होत होती. आता ही वेतन वाढ ३ टक्के होणार आहे. यासाठी एसटी महामंडळावर प्रत्येक महिन्याला ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासदारांनंतर आता 50 नगरसेवक शिंदेसेनेत जाणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

Jio Recharge : Jioच्या ₹198 रुपयांच्या रिचार्जमध्ये दिवसाला मिळणार 2 जीबी डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

राज्यात मान्सून पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

धूळ आणि घामाने चेहरा काळाकुट्ट झालाय? 'या' ५ घरगुती उपायांनी १० मिनिटांत मिळवा नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT