Pashan-Sus Flyover Update: पाषाण आणि सूस परिसरातून प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या परिसरातील वाहतूककोंडीची कटकट आता कायमची सूटणार आहे. कारण, मागील अनेक वर्षांपासून प्रस्तावित असणाऱ्या पाषाण-सूस उड्डाणपुलावरील कामाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील रस्त्याला जोडणाऱ्या ‘कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प’च्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर परिसरातील वाहतूककोंडी कमी होईलच. त्याशिवाय पुणेकरांचा वेळ वाचणार आहे. तसेच सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे.
पाषाण-सूस उड्डाणपुलाला राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील रस्त्याशी जोडणाऱ्या ‘कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प’ अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. अखेर प्रत्यक्षात या कामाला सुरूवात झाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूककोंडी फुटल्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. सध्या पाषाणकडून महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपूलाच्या शेवटापर्यंत जाऊन यू-टर्न घ्यावा लागतो. या फेऱ्यामुळे वाहनचालकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. त्यात वाहतूककोंडी झाल्यास नाहक त्रास होतो.
पण आता हा ‘कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प’ सुरू झाल्यानंतर वेळ वाचेलच. त्याशिवाय इंधनाचा खर्चही कमी होईल. अनेक वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. हा नवीन रॅम्प थेट सेवा रस्त्याला जोडला जाणार असल्याने हा धोकाही कमी होणार आहे. पाषण आणि सूस या परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासून ‘कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प’ची मागणी होती. ती काही दिवसात पूर्ण होणार आहे. याबाबत नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
महापालिकेकडून सुमारे ८ कोटी ३ लाख रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा रॅम्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वाहनचालकाचा किमान दोन किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडीही कमी होईल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.