Crime : डॉक्टरकीला काळीमा! ऑपरेशन थिअटरमध्येच बारावीच्या मुलीवर बलात्कार, मेडिकल क्षेत्रात खळबळ

doctor rape case : लखनौमधील खासगी रुग्णालयात बारावीच्या विद्यार्थिनीवर ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टरवर करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली असून रुग्णालयावरही कारवाई करण्यात आली आहे.
doctor arrested for rape in operation theatre
doctor arrested for rape in operation theatreSaam
Published On

doctor arrested for rape in operation theatre : एका डॉक्टरनं पांढर्‍या कपड्यात काळं कृत्य केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील ३० वर्षांच्या एका डॉक्टरने बारावीच्या मुलीवर ऑपरेशन थिअटरमध्येच बलात्कार केल्याची घटना उघड झाली. लखनौ पोलिसांनी नराधम डॉक्टरला बेड्या ठोकल्या असून तपास सुरू केला आहे. डॉक्टरने २० वर्षाच्या मुलीला गुंगीचे इंजिक्शन देऊन बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे.

लखनौमधील इंदौराबाग येथील एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी डॉ. विजय कुमार गिरी याला बेड्या ठोकल्या आहेत. सरकारच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने डॉ. विजय कुमार गिरी याचे लायसन्स रद्द केले आहे. त्याशिवाय रूग्णालयालाही कुलूप लावले आहे.

२० वर्षाची तरूणी अपस्मारच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाली होती. २१ मे रोजी आरोपी विजय कुमार गिरी याने ऑपरेशन थिएटरमध्ये विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितलं, त्यानंतर तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, १९ मे रोजी तिला अपस्मारच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. २१ मे रोजी दुपारी ३ वाजता मुलीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉ. गिरी यांनी ऑक्सिजन देण्याच्या बहाण्याने तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.

doctor arrested for rape in operation theatre
Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री! पुणे, साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; मुंबईत कसं असेल हवामान?

सुरुवातीला रुग्णाची मोठी बहीण आणि एक नर्स ऑपरेशन थिअटरमध्ये होत्या. पण काही मिनिटांनंतर डॉक्टरांनी त्या दोघींना बाहेर पाठवले. त्यानंतर डॉक्टरने तिच्या हाताला लावलेल्या इंट्राव्हेनस कॅन्युलाद्वारे मुलीला भूल देणारे इंजेक्शन दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर बलात्कार केला, असा आरोप कुटुंबियांनी केला.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, काही वेळाने तिला अर्धवट शुद्ध आली आणि डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत ती रडत रडत ऑपरेशन थिअटरमधून बाहेर पळाली. पोलिसांनी सांगितले की पीडितेने तिच्या प्रकृतीमुळे काही वर्षे शाळा सोडली होती आणि ती सध्या इयत्ता १२वी मध्ये शिकत होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दखल घेतली आणि रुग्णालय व डॉक्टर यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

doctor arrested for rape in operation theatre
मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल, अमित शाहांची तातडीने भेटणार, राज्यात नेमकं काय सुरू?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com