Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांचे काका जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते पक्षप्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary-

  • बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजित पवार गटात प्रवेश करणार

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप

  • संदीप क्षीरसागर यांना मोठा राजकीय धक्का

  • याच आठवड्यात होणार पक्षप्रवेश सोहळा

योगेश काशिद, बीड

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बीडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. बीडमध्ये ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आठवडाभरात पक्षप्रवेश करतील. हा संदीप क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये राजकीय उलथापालत होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. मात्र याच मतदारसंघातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वासनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

जयदत्त क्षीरसागर हे आठवडाभरामध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असल्यामुळे आणि दुसरा पुतणा योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये आहेत. तर तिसरे पुतणे हेमंत क्षीरसागर हे भाजपाच्या वाटेवरती आहेत. त्यामुळे बीडमध्ये आता क्षीरसागरांची विन विस्कळताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SA20 लीगचा चौथा सिझन डिसेंबरपासून; 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार सामने

Shocking: शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार! नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा जीव घेतला, ८ जण गंभीर

Maharashtra Live News Update: उदगीर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याची अरेरावी

Bihar Exit Polls : भाजपला मोठा धक्का; बिहारमध्ये तेजस्वी यादव धोबीपछाड देणार, एग्झिट पोलचा अंदाज

दिल्लीत स्फोट, महाराष्ट्रात धागेदोरे? डॉ. शाहीनाचं मुंबई कनेक्शन?

SCROLL FOR NEXT