Phaltan Doctor Death
PSI Gopal Badane surrenders after 48 hours on the run in Phaltan doctor suicide case; route traced from Pandharpur to Solapur.saam tv

Phaltan Doctor Death: फलटण टू बीड व्हाया पंढरपूर; ४८ तासात PSI गोपाल बदने कुठं-कुठं लपला?

Satara Doctor Death Case: फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा ४८ तासांपासून बेपत्ता होता. आज त्याने आत्मसमर्पण केले आहे. पोलीस त्याच्या पंढरपूर ते सोलापूर या हालचालींचा शोध घेत आहेत.
Published on
Summary
  • निलंबित पीएसआय गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर झाला आहे.

  • पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवली होती.

  • राजकीय नावे समोर आल्याने तपासाला नवा वळण मिळालं आहे.

साताऱ्यातील डॉक्टर मृत्यू प्रकरणात नवंनवीन खुलासे होत आहेत. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपींपैक असलेला निलंबित पीएसआय गोपाळ बदने याने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला. डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदणे दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेल्याची माहिती समोर आली होती.

महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यापासून निलंबित पीएसआय गोपाळ बदने याच शेवटचं लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला होता.

आरोपी गोपाळ बदने दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. त्यानंतर तो त्यांच्या घरी म्हणजेच बीडला घरी जाऊन आला. त्यानंतर त्याने काल रात्री उशीरा थेट पोलीस चौकीत हजर होत पोलिासंच्या स्वाधीन झाला. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने शनिवारी रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून सरेंडर केलं. रात्री जवळपास साडेबारा वाजता तो पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं सांगितलं जात आहे.

Phaltan Doctor Death
एवढीशी जरी शंका असती तर... फलटण आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान|VIDEO

हाती आलेल्या माहितीनुसार बदने हा सोलापुरच्या काही पोलिसांच्या संपर्कात होता. तो सोशल मीडियाद्वारे संपर्कात होता, अशी माहिती आहे. पीएसआय बदणे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले नाही तर त्यांना बडतर्फ केले जाईल, असं बदनेच्या कुटूंबियांना पोलिसांनी सांगितले. त्यानंतर बदने पोलीस चौकीत हजर झाल्याचं सांगितलं जात आहे.

Phaltan Doctor Death
Doctor Death Case : दुर्योधन-दुशासन भेटले, मुलीच्या मदतीला एकही कृष्ण आला नाही, वडिलांचा भावनिक आक्रोश

सरेंडर झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत पीएसआय बदने याने गुन्ह्याबाबत माहिती दिली. महिला डॉक्टरवर कसल्याही प्रकारे अत्याचार केला नाही. यासह त्याने त्याने इतरही काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या. पण संबंधित डॉक्टरसोबत त्याचे काही संबंध होते का? दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? याबाबत कोणतीच माहिती बदणे दिली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com