Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, छातीला गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? गूढ कायम

Beed Police: बीडमध्ये छातीला गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृतदेहाजवळ पिस्तुल आढळून आली. या तरुणाची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलिस करत आहेत.
Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, छातीला गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? गूढ कायम
Beed CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • तरुणाचा छातीला गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली

  • बीडच्या आष्टी तालुक्यात अभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

  • मृत तरुणाचे नाव मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण होते

  • तरुणाची हत्या झाली की आतमहत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये शनिवारी रात्री रक्तरंजित थरार झाल्याची घटना घडली. एका तरुणाच्या छातीला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली. बीडच्या आष्टी तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. तरुणाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ऐन दिवाळीत एका तरुणाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, छातीला गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? गूढ कायम
Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याचा अधिक तपास केला असता मयूरच्या छातीत गोळी लागण्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल आढळून आले. मयूर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, छातीला गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? गूढ कायम
Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याची हत्या की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे. घटनेचा अधिक तपास अंभोरा पोलिस करत आहेत. मात्र ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, छातीला गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? गूढ कायम
Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com