
बांगलादेशी किन्नर ज्योती माँ हिला मुंबईच्या शिवाजी नगर पोलिसांकडून अटक
ज्योती 30 वर्षांपासून ओळख लपवून राहत होती.
तिच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, 200 पेक्षा अधिक चेले
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
मयूर राणे, साम टीव्ही
Mumbai : मुंबईच्या गोवंडी भागात ज्योती माँ म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खान या ४४ वर्षीय किन्नर गुरुला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे.तिची मोठी प्रॉपर्टी आणि घरे मुंबई उपनगरात असल्याचे समोर येत आहे.
२०० पेक्षा जास्त चेले असलेला बाबू खान किन्नरांचा गुरु म्हणून गोवंडी मध्ये वास्तवास होती. मात्र काही दिवसांपूर्वी आठ बांगलादेशीना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना भारतात आणून त्यांना इथे राहण्यास तिने मदत केली होती. तसेच काही तक्रारदारांनी देखील याची माहिती पोलिसांना दिल्यावर शिवाजी नगर पोलिसांनी या किन्नर माँला ताब्यात घेतले.
या किन्नरची कागदपत्र तपासली असता तिचे जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.तिच्याकडे अनेक घरे आणि प्रॉपर्टी असल्याचे समोर येत आहे. अपहरण , मारामाऱ्या असे गंभीर गुन्हे ही दाखल आहेत. शिवाजी नगर पोलीस याचा पुढील तपास करीत आहे.
किन्नर ज्योतीचा मुंबईच्या गोवंडी,रफीकनगर,कुर्ला, देवनार, नारपोली आणि ट्रॉम्बे या भागात अधिक वावर असायचा. मागील ३० वर्षांपासून किन्नर ज्योती ओळख लपवून राहत होती. तिने बोगस आधार, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार केले होते. बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतात राहणाऱ्या किन्नर ज्योतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईत २० हून अधिक घरे असलेल्या ज्योती किन्नरची मालमत्ता कोटींच्या घरात जाते.
पोलिसांनी अटक केलेली किन्नर कोण आहे?
बांगलादेशी नागरिक बाबू आयनल खान नावाची किन्नर ज्योती माँ या नावाने 30 वर्षांपासून राहत होती. तिला पोलिसांनी अटक केली.
ज्योती किन्नरच्या टोळीमध्ये किती सदस्य होते?
किन्नर ज्योतीकडे 200 पेक्षा अधिक चेले संपर्कात होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.