
नंदूरबारमध्ये चांदसैली घाटात पिकअप गाडी कोसळून ८ जणांचा मृत्यू
अस्तंबा ऋषी यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात
गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते
अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू
सागर निकवाडे, साम टीव्ही
नंदूरबार : ऐन सणासुदीच्या काळात नंदूरबारमधील सातपुड्यातील चांदसैली मृत्यूचा घाट बनला. चांदसैली घाटातील तीव्र वळणावरून चारचाकी गाडी थेट 100 फुटावरून कोसळली. अवैध प्रवासी वाहतूक आणि खराब झालेल्या घाट मार्गाने 8 जणांचा बळी घेतला. १५ प्रवासी पिकअपमध्ये बसले होते. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते.
नंदूरबारच्या सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेहून परतणाऱ्या या भाविकांसोबत विपरित घडलं. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. या भीषण अपघातात ८ भाविक दगावले.
अपघातात वाहनाच्या मागच्या भागात बसलेले प्रवासी दबले गेले. त्यांना अपघातात जबर मार लागला. तर भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आदिवासी समुदायासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या यात्रेसाठी भाविक गेले होते. अपघातानंतर गंभीर जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'मी नोकरी करून घरी येत होतो. आमच्यासोबत डॉक्टर देखील होते. त्यावेळी एक गाडी वरून खाली येताना दिसली. आम्ही ही कार खाली येताना पाहिली. अपघातानंतर आम्ही प्रवाशांची प्रकृती तपासली. अपघातात मृत झालेल्यांना तिथेच ठेवलं. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मृतांसाठी रुग्णवाहिका पाठवली'.
पिकअप टेम्पोमध्ये १५ हून अधिक प्रवासी होते. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ऐन दिवाळीतील अपघाताने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.