Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV Nws Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. सिंधुदुर्गमधील बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

Priya More

Summary -

  • कोकणात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.

  • माणगाव खोऱ्यातील बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

  • आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षप्रवेश केला.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद कमी होऊन शिंदे गटाची ताकद वाढली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खोऱ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे माणगाव खोऱ्यात शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव खोऱ्यात उबाठाला खिंडार पडलं आहे. माणगाव खोऱ्यातील घावनाळे जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठाच्या ८०० कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. उबाठाचे विभाग प्रमुख रामा धुरी आणि उपविभाग प्रमुख प्रशांत माडगूत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला. शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर विभाग प्रमुख दिनेश शिंदे आणि माणगाव विभाग प्रमुख सचिन धुरी हे देखील यावेळी उपस्थित होते. आमदार वैभव नाईक जेवढ्या विकास कामांचा निधी अडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देतील तेवढी दुप्पट विकास कामे करून दाखवणार, असं निलेश राणे यावेळी म्हणाले.

माणगाव खोऱ्यातील गेल्या १० वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली. माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे गुरुवारी माणगाव खोऱ्यातील उपवडे, वसोली, दुकानवाड, मोरे, वाडोस, कांदुळी, महादेवाचे केरवडे निळेली या सर्व गावातील उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारोच्या संख्येने कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

विभाग प्रमुख मोरे रामचंद्र धुरी, माजी उपसरपंच यशवंत धूरी , शाखाप्रमुख कैतन फेराव माजी उपसरपंच अंकुश धुरी, रामचंद्र धुरी, महेश धुरी, लहू धुरी प्रकाश धुरी, काशीराम खरोडे, कृष्णा दळवी, पदु डोईफोडे युवा सेनाप्रमुख विशाल धुरी, बापू डोईफोडे , अरुण सावंत, विठ्ठल जाधव, जयराम डोईफोडे, रुपेश रे मूळकर , रमेश खरात, रामचंद्र धुरी ग्रामपंचायत सदस्य असून सौ ममता धुरीउपविभाग प्रमुख प्रशांत माडगूळ शाखाप्रमुख किरण म्हाडगुत, दीपक म्हाडगुत प्रदीप म्हाडगुत, भागोजी वरक, बाबा खरात, संग्राम थोकते, विठू वरक कांदुळी येथील कृष्णा साटम, रवी साटम, रमेश साटम, सूर्यकांत पवार, विठ्ठल सावंत मोहन सावंत, सुरेश सावंत, रमेश सावंत, निळेली येथीलपिंटू रेगडे, सुरेश परब, कांता परब, मुला जंगले, अनंत कोकरे, नितेश परब विकी परब, राजन धुरी, अशोक परब, सदू रेडगे, बलराम रेडगे, तुकाराम रेडगे, मंगेश रेडगे भाई पालकर उपवडे येथील सदानंद गवस, महादेव राऊत, कृष्णा गवस, राजाराम राऊत, दशरथ राऊळ, गोपाळ सावंत, मोहन धुरी मंगेश निकम, महादेवाचे खेरवडे येथील भास्कर केरवडेकर, नरेंद्र वेंगुर्लेकर, शंभू घाडी, सुदेश राणे, संतोष केरवडेकर, विद्या केरवडेकर सरस्वती केरवडेकर, कृष्णा परब निलेश परब, निधी परब, सोनू कोठेकर , सुनील राणे यासह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

SCROLL FOR NEXT